विरह
विरह
दूर सोडून गेली आहे तू मला
दुःख आज सांगावे सारे कुणाला
विरहात झुरतो आठवणीने
साथ का सोडली असेल रे तिने
कुठे कमी पडलो प्रेमात तुझ्या
असे का तोडले काळजाला माझ्या
एकटाच बसून त्या काठावर
वाहतात अश्रू नदी तीरावर
झोप रात्रीची लागत नाही मला
झोपताना रोज आठवतो तुला
भेटावसं वाटतयं खूप मला
विरहात तू आठवतेस मला
