STORYMIRROR

Devendra Ambekar

Tragedy

4  

Devendra Ambekar

Tragedy

एकांत

एकांत

1 min
2.2K


कधी कधी मुलं पण

एकांतात रडतात

कोणाला दिसू नये म्हणून

त्या एकांताच्या अंधारात

स्वतःला कोंडून घेतात


कोणी त्यांना भित्रा

बोलू नये म्हणून

दुःख पचवायचं आणि

भावना दाटून आणायचं

साधन असतं एकांत


आपल्या माणसानं पासुन

लांब गेलो की येतो

तो म्हणजे एकांत

का एकांतात राहतो आपण

का आपलं आयुष्य


कमी करतो आणि

काही गोष्टींचा आघात

आपल्या कोमल हृदयावर करतो

आयुष्य एकदाच मिळत

त्या कडे आनंदाने बघा


येणारा प्रत्येक दिवस

मनसोप्त जगा आणि

मग बघा कसा दूर होतो

तो म्हणजे एकांत.......

एकांत.........

एकांत...........


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy