STORYMIRROR

Nalanda Wankhede

Tragedy

4  

Nalanda Wankhede

Tragedy

पिंजरा

पिंजरा

1 min
1.4K


मुखवटा काढून बघा माझा

दुःख हे अंतरीचे

सावज भयाण दडले आहे

काळ्याकुट्ट सावल्यांचे


पिंजरा बनले जीवन माझे

स्वछंद मुक्तपणे उडू शकत नाही

शिकार करण्या टपले शिकारी

घरीदारी सग्यासोयऱ्यात सुरक्षित नाही


बंदी करुनी ठोकल्या बेड्या

काळजालाही जखडले

नजरेमधुनी घाले घाव पिशाच्च

नरक यातनेने पिसाळले


कपाळकरंटी झाले कशी मी

कसे सटविणे नशीब लिहिले

वासनांचे नाग गुंडाळती शरीराला

विकृत कौर्याने कळस गाठले


माणूस म्हणुनी पाहिले ना कुणी

हक्क सर्वानीच गाजवला आहे

मोकळा श्वास घेऊ द्या हो मला

मी तुमच्याच अंशाचा गोळा आहे


कारावास हा बंदीस्त झाला पुरे

बुजगावण्याला भिणार नाही

उघडून पिंजरा घेईल उंच भरारी

बाहुलं बनून नतमस्तक होणार नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy