Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nalanda Wankhede

Tragedy

1.4  

Nalanda Wankhede

Tragedy

तान्हुलीची वेदना

तान्हुलीची वेदना

1 min
276


नवरा दारुच्या धुंदीत पसरलेला

खायला घरी दाना नाही

काहीच कळेना मातेला

कसे भरावे चोचीत दानी

सांगितले कळवळून तरी दगडाला

पाझर फुटेणा


लेकरांच्या संगोपनाची जबाबदारी घेईना

माय निघाली बिचारी पांदन तुडवत

पिलांच्या उदराची भुक भागवण्या साठी

पण कार्टी रस्ता अडवून बसायची

मला सोबत घेउन चल म्हणायची

आईला काही केल्या कळेना

हृदयाची दुख्ख ही पचेना


एवढ़यात कार्टीच्या तक्रारी पण वाढल्या होत्या

वयात येण्याची लक्षण सांगत होत्या

मनाची कुरकुर तोकडया शब्दात सांगून गेली

काळजाला उल्ट फिरवून गेली

एकटें सोडुन बाहेर नको ना जाऊस

मलाही सोबत घेउन चल कामाला

अभ्यास मी करून घेईल,


पण असे एकटे घरी ठेवून नको तु बाहेर पडुस

कस सांगु तुला, आई तु समजुन घेना गं

तु घरी नसलीस की बाबा माझ्याशी

अश्लील चाळे करतात गं आई

मला जीवे मारायची भीति दाखवुन


माझ्याशी लैंगिक व्यवहार करतात गं आई

बाहेर बोललीस तर जीवंत जाळून टाकीन म्हणतात गं आई

आई मला खुप भीति वाटते गं बाबांची

आई कस सांगु तुला , ओटीपोटात खुप वेदना होतात गं

बाबा मला खुप खुप छळतात गं आई

पोटच्या गोळ्या सोबत असं कुणी वागतं कांग आई

ते माझे जन्मदाते ना गं , मग पोटच्या पोरीला असं कुणी बाटवतात कागं आई

हे विश्वास बसनारँ नाही आहे पण


सत्य हेच आहे गंआई ,

बाबांनी मला पुरतं संपवलय गं आई

त्यांच्यापासुन मला दिवस गेलेत गं आई

विश्वासच बसेना म्हणुन पड़ताळून पाहिल

आणि जीव जाइस्तोवर चोपलं


पोटच्या पोरिवर नजर ठेवली वासनान्ध नारधमान

मी ही पोलिसात दिल मोठ्या मनान

स्त्रीच्या वेदना स्त्रीच् समजु शकते

माय ही शेवटी स्त्रीच् असते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy