STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

3  

Sakharam Aachrekar

Tragedy

केव्हा सरायचे रे

केव्हा सरायचे रे

1 min
202

प्रत्येक श्वास मजला, आहे झुरायचे रे 

नाही बहार बाकी, आहे फुलायचे रे


आयुष्य दीप माझे, ज्याला प्रकाश नाही 

संपून वात गेली, बाकी जळायचे रे


ती लाट काय आली, अन जाहलो निराळे

जे व्हायचेच होते, नाही टळायचे रे 


मी वाट पाहिली ती, शब्दांत काय सांगू 

आयुष्य सरून गेले, माझे जगायचे रे


मी अर्पिले तुला जे, होते करांत माझ्या 

तू सांग काय बाकी, आहे उरायचे रे


माझ्या उभ्या युगाचे , सरले वसंत सारे

हे दुःख प्राक्तनाचे, केव्हा सरायचे रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy