STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Tragedy

3  

Sanjay Dhangawhal

Tragedy

एकाकी जगणे

एकाकी जगणे

1 min
302

प्रत्येकाचे बाबा आपल्या

मुलावर खूप प्रेम करतात

काया झिजवून आयुष्यभर पै पै जोडतात


राबराब राबून बाबा कधीच थकत नाही

लेकराच्या डोळ्यात

अश्रू येवू देत नाही

जगणे बापाचे मुलासाठीच असते

याची जाणीव मात्र

कुणालाच नसते


बाप सोडून जेव्हा पोरगा

दूरदेशी जातो

मुलाशिवाय बाप एकाकी जगतो

घर होते सुने सुने

बोल मुके होतात

रिकाम्या घरात दिवस

कसेबसे जातात


मुलगा सुखी झाल्यावर

म्हातारपण सुखात जाईल असे बाबांना वाटते

पण.... 

लाडाच लेकरू वाट पाहूनही येत नाही

शेवटचं डोळे भरून पाहता येत नाही


खांदे उसने शेजारपाजार चार

डाग अग्नीचा परका दोते

भेटीवाचून लेकराच्या

बाप तरसून मरतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy