STORYMIRROR

सुरेश पवार

Tragedy

3  

सुरेश पवार

Tragedy

काटकसर

काटकसर

1 min
280

आस लावतो आभाळाकडे,

एक टक लावून बघतो ढगाकडे,

कधी बरससील रे मेघराजा,

साऱ्या जगाचे लक्ष्य आहे तुझ्याकडे.।।।१।।।


तू आलास तर माझी मंदियाळी,

नाही तर कसली होळी अन दिवाळी,

मूलाचे शिक्षण मुलीचे लग्न,

नाही तर होईल माझी राखरांगोळी.।।।२।।।


दुष्काळ पडला छातीवर मुलीचे लग्न,

शोधत बसतो मी शेठ सावकार,

सावकाराच्या नावे करतो शेती,

कर्जाच्या खाईत माजतो हाहाकार.।।।३।।।


कधी ओला तर कधी सुखा दुष्काळ,

सारा कुटुंब फिरतो डोळ्यासमोर,

कस पोसू या सर्वांना चिंताग्रस्त होतो,

सावकाराची देणी पडते जीवसमोर.।।।४।।।


नका लावू गळफास,

लगीन खर्च करा हो कमी,

बचतीचे योग्य नियोजन करा,

जेवढे आपले पाऊल तेवढेच पसरा।।।५।।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy