STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Tragedy

3  

Sanjay Dhangawhal

Tragedy

जीवन हे क्षणभंगुर आहे

जीवन हे क्षणभंगुर आहे

1 min
351

या दोन घडीच्या जगण्यासाठी 

क्षण सुखाचे 

मोजून घ्यावे लागते

तोलून मापून जगावे लागते

हसणे आता उसने झाले आहे

हसण्यासाठी हसू शोधावे लागते


जाळे दुःखाचेतर घरोघरी दिसते

चिंता दारावर पहारेकरी असते

संकटाना तरी किती दुर करावे

सुखाच्या कशीद्यावर

वेदनेची पायवाट असते


जगणे विसरून गेला माणूस

कळत नाही कुठे धावतो आहे

सौख्य समृद्धीच्या नादात

श्वास विकत घेतो आहे

जीव व्हेंटिलेटरवर असतो तेंव्हा

खरच जगता आले नाही म्हणतो आहे


माणूस कधीच

स्वतःसाठी नसतो

फक्त पळत असतो

वितभर पोटासाठी

दोन घास पुरेसा असतो

दोनवार कपड्यातही

माणूस देखना दिसतो

तरीही माणूस 

श्रीमंत व्हायचे म्हणतो

या माणसांच्या गर्दीत

वाट मोकळी नसते

तरी पुढे जायला वाट काढत असतो


जगून घेतो माणूस

मंदिरात माथा टेकून

वाढवून घेतो आयुष्य

एक रूपया देवून

स्वार्थ माणसाचा पाहून

देवही म्हणतो 

मी का देवरूप घेतले

रोज गाऱ्हाणे ऐकून

कान माझे फुटले

मागणे माणसाचे कधीच सरत नाही

आत देवच माणसापुढे

नतमस्तक होवू लागले


तेव्हा जीवन हे

क्षणभंगुर झाले आहे

आज जगला तो जगला

उद्या काय होईल माहीत नाही

मग कशाला करायची मरणाची घाई

वय वाढले तरी

दोन घडीचा डाव खेळताना

लहान होवून जगायचं लहानपण दे रे देवा

बस एवढंच देवाजवळ मागायचं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy