STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

3  

Sakharam Aachrekar

Tragedy

आता पुरे

आता पुरे

1 min
364

सोबतीने तारकांच्या, जागणे आता पुरे 

रोजच्या त्या वेदनांना, सांधणे आता पुरे 


मिथ्य सारी प्रीत अन, ही झूट सारी बंधने

ताज ते नावे प्रियेच्या, बांधणे आता पुरे


वाट ही ना ओळखीची, अन कुणी ना आपले

सोबती येईल कोणी, पाहणे आता पुरे 


प्रीत नाही अन्य कोठे, नांदते ती अंतरी

कस्तुरीचा शोध घेण्या, धावणे आता पुरे


सांज पाठी राहिली अन, दाटला अंधार हा

सावल्यांच्या पाळतीला, चालणे आता पुरे  


कापरे झालीत आता, आसवे ही वाहती

अंतरी हर दिन, स्वतःला, जाळणे आता पुरे


मागता रे गंध थोडा, आसवे ज्यांनी दिली 

त्या विषांना अमृताचे, मागणे आता पुरे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy