STORYMIRROR

sarala deshmana

Others

4  

sarala deshmana

Others

नेत्र

नेत्र

1 min
356

घे पाहून सारे रूप नेत्रा

नटलेल्या या वसुंधरेचे

पशू पक्षी अन् आकाशातील 

सुंदर सुंदर नक्षीचे...


घे पाहून सारे रूप नेत्रा

घनश्याम अशा नभाचे

नाचणाऱ्या मयुराचे अन्

पहाट सरल्या भास्कराचे...


घे पाहून सारे रूप नेत्रा

शितल अशा चांदण्यांचे

पौर्णिमेच्या चंद्रप्रभेचे

सप्तरंगी इंद्रधनुचे...


घे पाहून सारे रूप नेत्रा

राम कृष्णाच्या गोष्टीचे

भारताच्या क्रांतीचे अन्

शूर छत्रपती शिवबाचे...


घे पाहून सारे रूप नेत्रा

मानवाच्या  प्रगतीचे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन