STORYMIRROR

Shital Yadav

Fantasy

3  

Shital Yadav

Fantasy

शुभकामना

शुभकामना

1 min
27.9K


जीवनरुपी शुभ्र कागदावरती

भावभावना प्रगटावी शब्दांनी

सुख-दुःखाच्या वळणावरती

आयुष्य बहरावे नवकाव्यांनी


तारका असंख्य आकाशीच्या

तेजस्विनी बनूनी लकाकती

मनोहारी गंधाने शब्दांच्या

शुभाशीर्वाद सकलांचे लाभती


सुखसमृद्धी,आरोग्य लाभावे

नसावी दुःखझळ जीवना

वृद्धिंगत व्हावी यशोकीर्ती

हीच तुमच्यासाठी शुभकामना



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy