सखे
सखे
लग्नाआधी मी, होतो लय हुशार
जगाच्या पंगतीत होता मला मान
लग्नानंतर भानामती का केले कुणी चेटूक
टपली कुणी मारली तर शोधाशोध करायचो
नेमकं कोण-नेमकं कोण म्हणून बावळ्यागत बसायचो
जबाबदारीची भावना नव्हती माझ्या मनी"२"
पैकं आणलं तरी बिनडोक्याचा मी
हसून खिदळून जगावं हिच माझी आशा"२"
जगासाठी ज्ञानी घरी मात्र तमाशा
नवर्याची जात हरली तुझ्यापुढे"२"
तुच माझी सिता आणि तुच माझी दुर्गा
विनोद आता पुरे गोष्ट एक खरी"२"
मी तुझं कुंकू तु माझी राणी
प्राण आणि श्वासाने एकत्रित नांदू
सखे तुझी साथ म्हणजे निश्र्चयाचा महामेरू.
