रक्षाबंधन
रक्षाबंधन
1 min
216
मनाच्या कोपऱ्यात ताई तुझी सावली
अस्तित्वात तर नाही मात्र कल्पनेत भरून पावली
मुकलो या प्रेमाला आठवण
तुझी आली
बायकोच्या रुपात सर्व नाती घेऊन आली
मनाच्या कोपऱ्यात....."१"
कधी बनली मैत्रीण,कधी बनली प्रेयसी
रक्षाबंधनाच्या दिवशी राखी घेऊन आली
मनाच्या कोपऱ्यात...."१"
डाव्या हातात बांधते तुम्हा मी राखी
एकटी आली पण नात्यांची शिदोरी घेऊन आली
मनाच्या कोपऱ्यात...."१"
बहिण नाही म्हणून देवाने
लेक पदरात टाकली
गोंडस परी माझ्या आयुष्यात घेऊन आली
मनाच्या कोपऱ्यात..."१"
