वॉटसअपच्या स्टीकरची गंमत
वॉटसअपच्या स्टीकरची गंमत
व्हाट्सअप च्या स्टिकर ची
गंमत असे न्यारी!!
स्टिकर पाहून मला
मजा येते भारी!!
मुलगी असते डुलत
स्टिकर वर एकदा!!
तिला बघून हसू येते
मला अनेकदा!!
लाडू जिलेबी कॅडबरीचे
स्टिकर जीव वेडावतात!!
क्षणभर का होईना
मनाला हेआनंद देतात!!
शुभेच्छांचे स्टिकर
देऊन जातात आनंद!!
स्टीकरक मध्यल्या भावना
देतात परमानंद!!
वाढदिवस ही साजरा होतो
स्टीकरच्या या शुभेच्छा!!
रुसवा फुगवा ही दूर होतो
करी सर्व पूर्ण इच्छा!!
