STORYMIRROR

Rajesh Naik

Comedy Romance

3  

Rajesh Naik

Comedy Romance

चारोळी

चारोळी

1 min
175

चारोळी १ 

वाटला जरी कणखर तो

तोच असतो हळवा

बाप म्हणून मिरवताना

बंध घाली आसवा


चारोळी २ 

काना तोंडाचा भार हल्ली 

बोटा डोळ्यांनी उचलला आहे

कितीही लिहीलेले वाचले तरी

मन ऐकायलाच आसुसले आहे.


चारोळी ३  

तिच्या नसण्याने तिचे असणे 

अजूनच अधोरेखित होते

असते तेव्हा लज्जेने बिलगू देत नाही

नसते तेव्हा तिची आठवण मिठी सोडतच नाही


चारोळी ४ 

गोड गोड गुलाबी प्रीतीतल्या कोणी 

धरलीच नाही जर कधी मिठाची गुळणी

नसणार मग अबोला नसणार मनधरणी

 प्रेमाची चव मग नाही का होणार अळणी


चारोळी ५

पावसातली ती नाही आज दिसणार

आज ती बहुधा उन्हातच न्हाणार

पण ऊनपावसाची आता नाही मला तमा

माझ्या मनातच तिने थाटलाय तिचा लवाजामा


चारोळी ६  

 त्रिकोणी कुटुंबातल्या लेकीचे

 होताना एकाचे दोन

आईचे गलबले मन

जाणिवेने होताना तीनाचे दोन


Rate this content
Log in

More marathi poem from Rajesh Naik

Similar marathi poem from Comedy