सखा
सखा
1 min
197
पतऐपतीची न ठेवता तमा
जो तळमळी भेटण्यास सुदामा
असा कृष्ण मला खूप भावतो
करुनी चेष्टा मारुनी टपल्या
जो विसरवी दुःखांच्या खपल्या
असा कृष्ण मला खूप भावतो
रचूनी मैत्रीचे थरावर थर
फोडी उरीतून स्नेहाचाच पाझर
असा कृष्ण मला खूप भावतो
भिजवी उधळून हर्ष रंग
असता जो सर्वांसंग
असा कृष्ण मला खूप भावतो
दिवसेंदिवस दृष्टी आड तो राहतो
पण हवा तेव्हा एका हाकेवरच असतो
असा कृष्ण मला खूप भावतो
असूनही तो नसतो
नसूनही जो असतो
असा कृष्ण मला खूप भावतो
म्हणूनच सभोवताली सर्वांमध्ये
त्याच्यासारखाच सखा मी शोधतो
कारण असा कृष्ण मला खूप भावतो
