घाबरटपणा
घाबरटपणा
आमचे ह्यांचे गुण
आज मी रचनेत उधळते,
घाबरटपणा कसा असतो
हेच रंगवून काव्य सांगते..!!१!!
मी म्हटले अहो ऐकलत का?
ह्यांचे कान जरी इकडे,
तरी तोंडातून शब्द न पडे
मीच बापडी गेले तिकडे..!!२!!
वृत्तपत्रात कोंबुन चेहरा
माझेच शब्द मनात त्यांच्या,
जवळ पाहताच क्षणात मला
रंगच उडाला चेहऱ्याचा ह्यांच्या..!!३!!
हसू फुटले मला जोरात
तरी आवरून माझ्या मलाच,
दिले पैसे बाजार आणण्यास
सुटे, आमचे हे न विचारताच..!!४!!
काय आणणार बाजारातून
विचार आता मी करत बसले,
एवढा धाक नको रे बाबा
माझेच नुकसान होत राहिले..!!५!!
सहज जरी बोलले
तरी ह्यांची धांदल उडते,
करू काय यांचे मी
आवळण्यास, नवा मार्ग शोधते..!!६!!
