दहावीचा निकाल विनापरीक्षेचा
दहावीचा निकाल विनापरीक्षेचा
परीक्षा नाही काही नाही,
तरी निकालाची लागली घाई.
निकाल बघण्यात गर्दी झाली,
निकालाची वेबसाईट क्रॅश झाली.
क्रॅश झाली निकालाची वेबसाईट,
निकाल व वेबसाईट यांच्यात लागली फाईट.
बघता बघता दिवस निघाला,
निकाल लागला निकाल लागला.
दहावीचा निकाल लागला,
परीक्षा नाही तरी निकाल लागला.
दहावीचा निकाल विना परीक्षेचा,
पण अकरावी प्रवेशासाठी मार्ग सीईटीचा.
सीईटी परिक्षेसाठी
अभ्यासक्रम दहावीचा,
विद्यार्थी घाबरला अभ्यास नाही दहावीचा.
विचार केला दहावीचे पुस्तक काढले,
निकाल लागला तरी विद्यार्थी दहावीच्या अभ्यासाला लागले.
