किमया...
किमया...
भिंतीला लागला पाण्याचा झरा,
बायांनो बिगीबिगी भांडी भरा.
बिगर धुराची चूल ही पेटली,
सारीच ती भांडी कपाटात लपली.
गरम खोक्यात सारेच भाजतात,
वीजेच्या यंत्रावर स्वयंपाक करतात.
डब्यातून कपडे धुवून निघतात,
उन्हाशिवाय ती सुकलेली असतात.
पंख्याविना मिळतेय गार गार हवा,
शीत कपाटात तुम्ही काहीही ठेवा.
वीज कशी आली बघा फरशी खालून,
अन प्रकाश पडला तो छता मधून.
असा काही येथे चमत्कार घडतो,
अंधार होताच उजेड पडतो.
