सख्ख्या बहिणीचा वाढदिवस
सख्ख्या बहिणीचा वाढदिवस
अग छोटी,
काल रात्री अजबच घडल
मला विचित्र स्वप्नच पडलं
होते मी आपल्या घराच्या दारी
घरी चालला होता तुझा वाढदिवस भारी....
पहिले समजलं नाही चाललंय काय
कारण तुया वाढदिवसात तुन मले बोलवलंच नाय
वाटे माया बहिणीने दिला माया छाताड्यावर पाय
वाटे सगळं पाहून माय या जगात कोणीच नाय....
सगळे होते बाई वाढदिवसाच्या नादात
मी मात्र आता घुसले चुपचाप घरात
कोणाचच लक्ष नाही म्हणून म्या आता बिचकले
पण तुयही लक्ष नाही म्हणून म्या जास्तच दचकले
मले तुया राग आता लय आला बावा
ठरवलं आता खातो तुया केक अन मावा
म्हणून म्या चुपचाप किचन मध्ये घुसले
खाल्ला पूर्ण केक अन सगळे डोसे
तुलेबी माहित म्या हाय लयी भुक्कड
चालवतो खायासाठी वेगवेगळे चक्कर
म्हणून म्या केला तुया पूर्ण केक फस्त
मले सगळ्यांले दाखवाच होता म्या हाय लय मस्त
केक खाऊन माय आता झालं काम पूर्ण
म्हणुन हॉलमध्ये जायासाठी घेतला किचनमधून टर्न
म्या आता निघाली किचनमधून पटकन वाणी
जाऊन बसले हॉल मध्ये गूपचाप जाऊनी
सगळे म्हणे आता कापू राव केक
म्हणून तु आईले पाठवलं किचनमध्ये स्ट्रेट
आई आली घेऊन खाली केकचा डब्बा
मंग सगळे आईले विचारे केक कुठाय बावा
आई म्हणे केक बहुतेक खाल्ला कोणीतरी
सगळे आता विचारे कोणी केली ही चोरी
तेव्हा म्या होती खूष आनंदी होती लय
म्या केली चोरी पण मले न्हायी भय
म्या म्हटलं मनात म्या दाखवला आपला तोरा
मले नाही बोलवत म्हणुन म्या बनतो आता चोरा
पण आता मात्र अजिबच घडल
सोचल न्हवतं ते कानी पडलं
बाबा म्हणे आता बोलवा पोलिसाले
केक ज्यानं चोरला, चांगला इंगा दाखवू त्याले
आता मायी मात्र चांगलीच टरकली
थोडयाश्या केकान आग चांगलीच भडकली
पण म्या केला विचार आता घाबराच नाय
केक आहे माया पोटात हे कोणाला माहित न्हाय
जोपर्यंत मायी ढेकर तोंडातुन निघत नाय
तोपर्यंत मी आता लय सुरक्षित हाय
पण थोडयाच वेळात म्या तुयाकड बघितलं
तुया डोळ्यात अश्रू पाहून माय मन दाटलं
रक्ताच नातं काय ते अश्रू मुळ कळलं
म्या केली चुकी पण आता मायच मन रडलं
बाबा पोलिसाले बोलवताच मले जाग आली
स्वतःले सावरताच कळलं मी होते स्वप्नाच्या महाली
आता मले समजलं की हे होत सगळं स्वप्न
सगळं काही चांगल पाहून मी झाले थोडे स्तब्द
काही क्षणात मी माया डोळ्याले हात लावला
हात लावताच अश्रूचा थेंब माया हातावर सांडला
सांडताच त्या अश्रूची किम्मत मले कळाली
स्वप्नी तुया डोळ्यातला अश्रू माया डोळ्यात न्हाली
या स्वप्नावरून मला एक गोष्ट कळाली
लहान बहिणी मात्र असतें थोडया ताली
पण त्यांच प्रेम हाय स्वर्गावाणी
रक्तात असूनही दिसतेय अश्रूतुनी
तु मायी बहीण हाय लई भारी
म्या माया आनंद फक्त तूझ्यावरच वारी
तूझ्या पासुन दूर जायची माझी तयारी न्हायी
आयुष्य असले दोन तरी आपण एकच हायी
अग कितीदा मी माझ्या मनाशी लढले
तूझ्या आनंदासाठी देवाच्या पाया पडले
तूझ्या आनंदाला पाहून वाटे हारावि दुनिया सारी
फक्त तुला जिंकवण्यासाठी व्हावं तुझा कैवारी
बहीण आहे म्हणून जग आहे खरंच मस्त
जरी माझे कपडे घालते तु लय स्वस्त
पण दिसते लय गोड काय बोलू राव जास्त
खरंच मायी बहीण तु हाय जबरदस्त
तूझ्या वाढदिवसाला तुला भेटेल गिफ्ट लयी
पण पैशाच मोल माझ्या या कवितेला न्हायी
आजच्या दिवसाला मात्र एकच गोष्ट म्हणते
तुझ्यासारखी बहीण मी माझं भाग्य समजते
