Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Harshada Shimpi

Comedy


3  

Harshada Shimpi

Comedy


माया

माया

2 mins 206 2 mins 206


मनी ठेवून आशा | निजलो मी कालच्या निशा |

दिसे स्वप्न सुंदरा | मिटता या नयना ||

शाळेत समोर आली विद्या | तूच माझी आराध्या | मन हे प्रसन्ना | करी हजारदा वंदना ||

म्हणालो बघ किती सुंदर तुझे डिंपल | रूणझुण वाजती ह्या पायल |

माझं हृदय ही असंच कोमल | बर्फासारखं शितल ||

तू गोपिका | तू मोहिनी | होशील का माझी जीवन संगीनी |

कर एवढी कृपा | हो माझी रुपा ||

पण काय सांगू तिचा महिमा | सोडली नाही तिने गरिमा |

कळेना काय होती तिची कामना | फुकट गेली सगळी साधना |

कितीही केल्या जरी प्रार्थना | शिक्षेत गेली सगळी चेतना ||

नाही झाली काहीच प्रगती | सगळया पुसुनी वाईट स्मृती |

करुनी मनिषा | ही नवी उषा |

तुझी शपथ घेऊन वृंदा | आईच्या मते भेटू दे मला ज्ञानदा ||

म्हटलं आता कॉलेज मध्ये तरी भेटेल तरुणा | कोणालातरी येईल माझ्यावर करुणा |

आता एकच ध्यास ठेवायची सगळीकडे दृष्टी | पिंजून काढायची सृष्टी |

पारायणं करायची तव शक्ती | आणि  प्रत्येकीची भक्ती ||

येऊ दे परतुनी धुंद ह्या वर्षा | घेऊनी येवो उत्कर्षा |

थेंब पडता जशी वीज चमकली नभा  | ऊजळूनी गेली जशी वसुधा |

बनवेन तुला मी माझी अप्सरा| जर झाली तू मजसाठी इरा|

चिंब भिजुनी मनाच्या मिटू दे ज्वाला | गळ्यात पडू दे प्रेमाची माला ||

घेऊनी ज्योती | लावुनी नैना |

दिसताय समोर कित्ती या ललना ||

घातली जरी पालथी धरा | गर्भातूनी अनमोल रत्ना |

कधीतरी गवसेल हिरा | ही माझी वेडी कल्पना ||

एका शुभमुहूर्तावर अश्विनी | रात्रीच्या त्या प्रखर चांदनी  |

सुरेल कुठे तार छेडते वीणा | आणि मला भेटली तराणा  ||

होती जशी अपेक्षा | मिटली ही प्रतीक्षा |

हो माझी संगीता | की करु आधी मी तुजवर कविता ||

नाही मजजवळ तेवढी प्रतिभा  | असमर्थ हे शब्द पोहोचण्या तव गाभा |

तू वसते सदा तन्मयी | एकच आहेत आपल्या ह्या रूही ||

मी जाऊ कोणत्या दिव्या | तू जवळी रहा हेच मागणे माझ्या काव्या |

करतो तुझी आरती | हिच माझी वेडी प्रीती ||

किती सहज म्हणालीस नाही तू स्वच्छंदी | रहा कायम आनंदी |

बघ ही माझी अंजली | सुखाची ही तेवढीच पल्लवी |

जरी आता आहे रिती | हिच माझी नियती ||

वाटलं होतं आता तरी मिळेल छाया | शेवटी काय तर सगळी ही माया ||


Rate this content
Log in

More marathi poem from Harshada Shimpi

Similar marathi poem from Comedy