Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Harshada Shimpi

Children Stories

3  

Harshada Shimpi

Children Stories

माकडचाळा

माकडचाळा

1 min
288


अगडम बगडम आवाज आला धुप्प 

माकड गेले घाबरून करु लागले हुप्प  

इकडून तिकडून सैरावैरा कुठे कुठे पळू

कोणीतरी लागलंय मागे काय मी करू?

केली सगळ्यांची झोपमोड खुप

ऊठवली जंगलात आरोळी हुप्प

हत्तीदादा हत्तीदादा वाचवा वाचवा मला

सोंडेत पाणी भरुन उडवून द्या फवारा

जिराफ काका जिराफ काका बघा उंच करुन मान 

दिसतंय का कोणी तिकडे दाखवून द्या तुमची शान

अस्वलभाऊ अस्वलभाऊ मारा पहेलवानी पंजा

मधाचं पोळं लटकलंय सांगतो तुम्हाला तिन्ही सांजा

चिऊ ताई चिऊ ताई बोलाव सगळयांना 

संकटात आहेत सगळे दे इशारा

अचानक झाली गर्जना सिंहराज आले रुबाबात

म्हणाले काय चाललाय रे गोंधळ आणि बसले दिमाखात

महाराज महाराज कोणी तरी केलाय हल्ला वर्मावर

आणि बेतलंय माकडाच्या जीवावर

सेनापती गेंडेराज बोलले पटकन

आणि जाऊन बसले जागेवर धपकन 

महाराज खवळले कोणाची एवढी हिम्मत 

भेटू दे एकदा करतो मग त्याची खुशामत

त्या आधी बोलवा त्या माकडाला घेतो त्याचा समाचार

नंतर करतो समस्येवर विचार

ससा म्हणाला महाराज त्याला शिक्षा नका करु

शोधून काढतो आधी मी कारण मग लगेच निर्णय घेऊ

ससा गेला झाडावर जिथे माकड होते झोपले

शोधलं आजूबाजूला आणि सगळीकडे नीट पाहिले

तितक्यात सशाला नेमकं कारण सापडले

तुटलेले एक फळ त्याला फांदीसकट दिसले

घेऊन ते फळ त्याने सगळयांना दाखवले शंभरदा 

माकडाची झाली दैना अन् सगळे हसले खदाखदा

माकडा करू नको तू माकडचाळा 

अशाने बसेल तुझ्यावर कायमचा आळा 


Rate this content
Log in

More marathi poem from Harshada Shimpi