संडास.
संडास.
आळीतल्या समद्या बाया मिळून निघाल्या परसाकडला
घरात संडास नाही हागायला
हेंच्या घरच्यांना चावडीत बसून येतंय मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायला
घरातल्या बाया बापड्या उन्हात चालल्या रानात हागायला
घरच्या पुरूषांना नाही होत लाजायला
घरच्या आया बायांना पाहून जाताना हागायला
काय करावं संडास आली जर रातचाला
साफ होतबी नसंल सापा किरूडूच्या भयाला
मायला हेंच्या नुसते हायत बाशकळ बोलायला
पावसा पाण्यातबी जावंच लागत असंल की हागायला
जेव्हा पाहवं तेव्हा चिघळत बसतेत राजकारणाला
जसा हेंचा बा येनार हाय निवडून विधान सभेला
बक्कळ पैसा हाय फालतूचा खर्च करायला
फक्त पैसा नाही घरात संडास बांधायला
खोटंच म्हनत्यात बायकोला
माझा जीव हाय फक्त तुझ्यावरून ओवाळून टाकायला
हे ऐकून बायको म्हनत असंल आपल्या नवर्याला
संडास घ्या बांधायाला
लाज वाटती सडकेच्या कडेवर बसून हागायाला
कोनी बी आल की हागता हागता उठायला अन बसायला
संडासाचा त्रास नसल का बर पुरषाला
त्याना बी जावंच लागतंय हागायला
पन ह्या बाबतीत वेळ नाही विचार करायला
घरात कोनीबी आलं की त्यांना सगळ्यात पहिले टमरेल मिळतंय पाहायाला
कल्पना करा जेच्या घरात सोय नाही जायची संडासाला
त्यांच्या पाहुण्यांची काय अवस्था होत असंल सकाळच्याला
कसं वाटत असंल जेव्हा पाहुणा बी टमरेल घेऊन निघाला हागायाला
घरमालक घेऊन निघाला पाहुण्याला सकाळी सकाळी हागायला
हा पाहुणा सकाळी दहा वाजेपर्यंत सगळ्या गावचा चर्चेचा विषय झाला
ज्यांच्या घरी संडास नाही हागायला
तेंच्याकडे पाहुणा बी दहा वेळा विचार करीत असंल यायला
काय करावं पाहुण्यानं, जर संडासाला जायचं असंल रातचाला
जस काही हा त्रास कमी होता की काय असे वाटले देवाला
म्हणून भरपूर वाढवून ठेवली डुक्करांच्या संख्येला
जेव्हा जेव्हा जावं हागायाला डुक्करं असत्यात सोबतीला
वाटच पहात असतात केंव्हा बसतोत आम्ही हागायाला
एवढ्या सर्व त्रासातून वाचायला
उपाय एकच, ताबडतोब घ्या घरातच संडास बांधायला
आणि बसा निवांत हागायला
न भ्या उन्हाला, पावसाला, सापाला अन रातचाला
