अपेक्षा
अपेक्षा
भाग्यात असल्याशिवाय काही मिळत नाही.
परमेश्वराच्या कृपेशिवाय मिळालेले टिकत नाही.
आपल्याला येताना बरोबर काही आणता येत नाही
आपल्याला जाताना बरोबर काही नेता येत नाही.
आपण करावे म्हणले तर काही होत नाही.
बरे आपण काहीही केले तरी आपला अंत काही टळत नाही.
हे सगळे माहीत असूनही आपल्या जगण्यात फरक पडत नाही.
आपला हव्यास काही केल्या सुटत नाही.
माणसांना माणूसकीने सहज जीवन जगता येत नाही.
आवश्यक आणि अनावश्यक काय हेही कळत नाही.
आपण फक्त प्रवासी आहोत हे लक्षात रहात नाही.
अपेक्षांच्या जाळ्यातून स्वतःला सोडवून घेत येत नाही.
अपेक्षा नाहीत म्हणून अपेक्षाभंगाचे दुःखही नाही.
आहे त्यात समाधान आहे म्हणून हाव नाही.
प्रयत्न हातात आहेत पण यश हातात नाही.
कधीतरी सगळे संपणार आहे या विचारात जे सुख आहे ते सुख कशातच नाही.
