STORYMIRROR

Sanjay Udgirkar

Others

3  

Sanjay Udgirkar

Others

देव देतो....

देव देतो....

1 min
126

देव देतो.

पण भाग्य भोगू देत नाही.

पाऊस पडतो.

पण आपल्या शेतात पडत नाही.

माणूस खूप कष्ट करतो.

पण कष्टाचे चीज होत नाही.

घास हातात असतो.

पण तोंडात जाऊ शकत नाही.

सुखात जो तो आपला असतो.

दुःखात कोणी ओळखसुद्धा दाखवत नाही.

सगळा वेळेचा खेळ असतो.

वाईट वेळी आपली सावली आपल्या सावलीला थांबत नाही.

जो तो ज्याचा त्याचा असतो.

आपल्याला आपले म्हणणारा मिळत नाही.

म्हणतात की तो सर्व काही व्यापून असतो.

जसे दूधातच तुप असते पण दिसत नाही.

सल्ला न मागता मिळतो.

मदत मागूनही मिळत नाही.

शिकवणारा मिळतो.

शिकवलेले आचरण करणारा मिळत नाही.

वरून वरून जो तो चांगलाच असतो.

वेळ पडल्याशिवाय माणसाची नियत कळत नाही.

ज्याला आपण आपला समजतो,

तोच आपल्याला फसवल्याशिवाय रहात नाही.

पापकर्मे करून पुण्यकर्मांची फळे मागतो.

माणूस देवालाही फसवायला मागेपुढे पहात नाही.

माणूस केलेल्या कर्मांचीच फळे भोगतो.

पेरलेले कापावे लागते याला अपवाद नाही.


Rate this content
Log in