STORYMIRROR

Sanjay Udgirkar

Others

3  

Sanjay Udgirkar

Others

काही काही

काही काही

1 min
160

काही काही कविता काय असतात

वाचताच सरळ काळजाला भिडतात

डोळ्यातील पाणीच उपसून काढतात

रात्रीची झोप उडवून टाकतात


काही काही कविता काय असतात

आश्चर्याचा प्रचंड धक्का देतात

विचारांचे डोक्यात वावटळ उठवतात

आपल्याला आपली ओळख करवून देतात


काही काही कविता काय असतात

टराटरा चेहर्‍यावरचे मुखवटे फाडतात

सत्याची सत्त्वपरीक्षा घेतात

खोट्याला समाजात नग्न करतात


काही काही कविता काय असतात

वाचताच गर्वाचे हरण करतात

अंतर्मनाचा आरसा होतात

लाजेने मान खाली घालायला लावतात


काही काही कविता काय असतात

कधी कधी अव्वाच्या सव्वा खोटी स्तुती करतात

कोळशाला पौर्णिमेच्या चंद्राची उपमा देतात

काही म्हणजे काहीही कल्पना करतात


काही काही कविता काय असतात

भित्र्याला धैर्यवान करतात

आत्मविश्वास ठासून ठासून भरतात

जिद्दीने जगण्याची उमेद बांधतात


काही काही कविता काय असतात

निराधाराचे आधार होतात

तळागाळातल्यांना आकाशात भरारी मारायला लावतात

मुंगीला चक्क हत्ती करून सोडतात


काही काही कविता काय असतात

निराश झालेल्यांना नवीन आशा देतात

हतोत्साहित झालेल्यांना उत्साहाने ओतप्रोत करतात

शाब्दिक संजीवनी होतात


काही काही कविता काय असतात

ह्रदयात प्रेमाचा पाझर फोडतात

चांगल्या भल्या माणसाला वेड लावतात


चक्क दगडात देव दाखवतात

काही काही कविता काय असतात

माणसाला निराश करतात

उत्साही माणसाला निरुत्साही करतात

सुखी माणसाला दुःखी करतात


काही काही कविता काय असतात

कवीच्या कल्पनेचे खेळ असतात

दिवसा चंद्र आणि रात्री सूर्य असतात

कवीच्या म्हशी आकाशात उडत असतात


काही काही कविता काय असतात

कवीच्या डोक्यातील वळवळ असतात

कधी पचत नाहीत तर कधी पचतात

जाऊ द्या ना, डोक्याला शीण आणतात


Rate this content
Log in