त्याचे काय आहे
त्याचे काय आहे
त्याचे काय आहे
मला जेव्हाच्या तेव्हा काही कळत नाही
समोर होत असलेलेही माझ्या डोक्यात शिरत नाही
मी माझ्या अनुभवातून काही शिकत नाही
हुशार म्हणवतो स्वतःला पण नाही
त्याचे काय आहे
मी इतिहासातून काही शिकत नाही
केलेली चूक पुन्हा करू नये एवढेही मला कळत नाही
माझी विश्वास ठेवायची खोड काही जात नाही
बरेच काही गमावलो आहे थोडेफार उरले आहे तेही वाचवायची तयारी नाही
त्याचे काय आहे
मी जिवंत आहे का नाही
हेच मला माहीत नाही
पाहूनही शिकण्याची इच्छा नाही
माझ्यावर अत्याचार करणारे थकले, मी नाही
त्याचे काय आहे
मला कणाच राहिला नाही
स्वाभिमानाचा लवलेश उरला नाही
जगण्यासाठी ध्येयच उरले नाही
मरण येईपर्यंत जगण्या शिवाय गत्यंतर नाही
त्याचे काय आहे
पूर्वजांनी केलेल्या त्यागाची मला किंमत नाही
म्हणून काहीही चालवून घेण्याशिवाय पर्याय नाही
गुलामी केल्याशिवाय जगल्यासारखे वाटतच नाही
चालतंय हो एवढा विचार करायचा नाही
असे समजवणार्यांची कमतरता नाही
