देवाच्या दारी
देवाच्या दारी
देवाच्या दारी,
उभे नर आणि नारी,
देव तयांस विचारी,
काही चांगले काम केले का भूवरी?
केले का दान काहीतरी?
केले का धर्माचे पालन थोडेतरी?
केला का धर्माचा प्रचार प्रसार थोडासा तरी?
केले का उपकार निस्वार्थ भावनेने कोणावरी?
सांगा ना काय काय केले जन्म-जन्मांतरी?
ओझे कशाचे वाहिले इथवरी?
आशीर्वाद आहेत का कोणाचे शिरावरी?
का रे दिसता असे दिन आणि भिकारी?
काहीच पुण्यसंचय नाही का रे पदरी?
एवढी पापे केलीत कशाच्या जोरावरी?
मी आहे हे माहीत असूनही विश्वास ठेवला नाही मजवरी
आता सगळे आठवले वेळ गेल्यावरी
सुखात होतास तेव्हा आली का माझी आठवण तरी?
रमला होतास संसारी
बायको आणि मुलं हेच तुला प्रिय होते सर्वापरी
आज कोणी आले आहेत का रे तुझ्या बरोबर माझ्या दारावरी
सुखात सर्व होते तुझे, दुःखात तुझा फक्त मी श्रीहरी
आता इथे पोहोचल्यावर सर्व विचार करी
म्हणे जन्ममरणाच्या फेर्यातून सोडव आतातरी
माझ्या कर्माच्या फळांची राखरांगोळी करी
इथे आल्यावर म्हणसी चूकव जन्ममरणाची वारी
या भवसिंधुत मज तारी
नेई मला सुखाने पैलतीरी
आलो आता तुला मी शरण, मला क्षमा करी
