पाण्यात
पाण्यात
1 min
110
दवबिंदू आहे
घरंगळून नाहीसा होणार आहे
आहे तोपर्यंत सूर्यकिरणांमुळे चमचमणार आहे
दवबिंदूच्या जीवनाचे यातच साफल्य आहे
इंद्रधनुष्य आहे
सप्तरंगाने नटले आहे
सुंदर आहे पण सगळे उसने आहे
सगळेच उसने ही व्यथा आहे
समुद्रात उठणारी लाट आहे
समुद्राहून वेगळे लाटेचे अस्तित्व कोठे आहे
समुद्रातच उमटायचे आणि मिटायचे आहे
वर्तुळात फिरत रहायचे आहे
पाण्यात पडलेले मीठ आहे
पाण्यात विरघळायचे आहे
अस्तित्व विलिन करायचे आहे
पाण्याची ओळख बदलायची आहे
