Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Udgirkar

Others

3  

Sanjay Udgirkar

Others

तहान

तहान

1 min
130


कोण मोठे आणि कोण लहान.

आजकाल सगळेच झालेत एकसमान.

लहान घरात आवश्यकतेपेक्षा जास्त सामान.

माहिती भरपूर आणि कमी ज्ञान.


सगळ्यांना न भागणारी पैशाची तहान.

पैशासमोर शेपूट घालणार आणि तुकविणार मान.

पैशेवाल्या चारित्र्यहीनाला म्हणणार चारित्र्यवान.

निंदा ऐकण्यासाठी आसुसलेले असतात दोन्ही कान.


कधी करणार नाहीत कोणाला दमडी दान. 

पाहिजे फुकटची प्रसिद्धी आणि मानपान. 

लाचलुचपतीच्या संपत्तिचा बाळगतील थोर अभिमान. 

अहंकाराने मातलेले करतील सज्जनांचा अपमान. 


स्वतः असून मुर्खशिरोमणी लोकां सांगतील ब्रम्हज्ञान. 

जिथे थुंकू नये तिथेच पचापच थुंकतील खाऊन पान. 

खातील अभक्ष्य आणि करतील अपेयपान. 

कधी करणार नाहीत साधे अन्नदान. 


असून कर्जबाजारी दाखवतील खोटी शान. 

स्वतःचे करतील सदोदित गुणगान. 

ज्याला त्याला विचारतील आहे का कोणी माझ्या इतका यशस्वी आणि कर्तृत्ववान. 

हे स्वयंघोषित महान आणि बाकीचे यांच्यासमोर किटकासमान. 


कर्जाच्या जोरावर यांची ताठ मान. 

सरड्याहूनही लवकर बदलतील आपले रंग छान. 

पैशासाठी सहन करतील थोर अपमान. 

ठेवतील काढून आपला अहंकार आणि अभिमान 


जिथे स्वार्थ तिथे पाय धरून मागतील माफी आणि धरतील आपले कान. 

होतील लहनाहूनही लहान. 

निर्लज्ज होऊन हसतील आणि गिळतील अपमान. 

एका माळेतील मणी कोणी मोठे कोणी लहान. 


Rate this content
Log in