जेव्हा जे.....
जेव्हा जे.....
जेव्हा जे आठवावे ते आठवत नाही.
केव्हा काय बोलावे हे अजूनही कळत नाही.
केव्हा हसावे, केव्हा हसू नये अजूनही उमजत नाही.
चारचौघात कसे वागावे हेच अजून कळत नाही.
चारचौघात जे बोलू नये तेच बोलल्याशिवाय रहात नाही.
साठी उलटली पण चारचौघांसारखे वागणे आले नाही.
कोठे जावे, कोठे जाऊ नये हे कळलेच नाही.
जाऊ नये तिथे गेल्याशिवाय रहावले नाही.
जे सोसत नाही आणि जे पचत नाही.
ते खाऊ नये एवढेसुद्धा करणे आयुष्यात जमले नाही.
जगणेच पचले नाही ह्याचेही काहीच वाटले नाही.
खरे म्हणजे कधीही कशाचीही तमाच बाळगली नाही.
आलो काय-गेलो काय, कशाचेच काही वाटले नाही.
आयुष्य घालविण्याशिवाय विशेष असे काही केले नाही.
मागच्यांची काळजी नाही आणि पुढे काय याचे ज्ञान नाही.
बघता बघता वेळ संपली, पण धुंदी उतरली नाही.
