असचं असतं
असचं असतं
1 min
108
इथे असचं असतं
आश्चर्य करायचं नसतं
रोज तेच असतं
नवीन काहीच नसतं
जन्माला यायचं असतं
जीवन जगायचं असतं
वेळेवर मरायचं असतं
फिरून तेच असतं
नुसत समजायचं असतं
खरं काहीच नसतं
मानलं तसं असतं
शाश्वत काही नसतं
नाहीतर नाही असतं
आहेतर आहे असतं
सगळं आपल्यावर असतं
सोडून टाकायचं असतं
सुख सुख नसतं
दुःख दुःख नसतं
अदलत बदलत असतं
मनावर घ्यायचं नसतं
धरलं की चावतं
सोडलं की पळतं
धरायचं ही नसतं
सोडायचं ही नसतं
सगळं सोप्पही असतं
तेवढच अवघडही असतं
गिळता येत नसतं
थुंकताही येत नसतं
फक्त चघळायचं असतं
काहीच संपत नसतं
फक्त सोसायचं असतं
इथे असचं असतं
