STORYMIRROR

Ujwala Rahane

Comedy

3  

Ujwala Rahane

Comedy

कसं काय या कोरोनाने मला गाठलं

कसं काय या कोरोनाने मला गाठलं

2 mins
206

किती जिवाला जपायचे ते मी जपले,

पण या कोरोनाने मला गाठले.

 पाच सहा महिने मी घरातच होते बसले.

ना कोणत्याच सभारंभात मी दिसले.

स्वत:ला जपायचे तेवढे जपले.

 पण कसे काय या कोरोनाने मला गाठले?


 आठवत होतं मी मनाशी,

कशी काय जखडले गेली मी या कोरोनाशी?

घरातच तर होते, सामानदेखील ऑनलाईनच मागवते.

कामवाली घरात येत नाही. चिमुकल्यांची शाळा देखील घरातच होई.

बाग, शाळा, ऑफिसही अहो हॉटेल पण

सगळे म्हणजे सगळे काही घरातच होते थाटले.

 मग कोरोनाने कोठून आणि कसे काय हो मला गाठले?


 वारंवार हात मी धुते, बाहेरच्या व्यक्तीशी बोलताना नाकावर मास्कही चढवते. 

सामाजिक अंतराचे भानदेखील मी पाळते, 

मग कोणत्या नियमाच्या विरूद्ध मी वागते?

कोठे माझे चुकले? 

 मग कसे काय बाई मला या कोरोनाने गाठले? 


 वर्ष झाले सगळे पदार्थदेखील घरातच करत होते.

कुटुंबातील सगळ्या सदस्याची काळजी मी जातीने घेत होते.

माझे कामकाजदेखील घरातूनच करत होते.

कोणतेही समारंभ मिटिंग्स झुमवर अटेंड करत होते.

मग कुठे माझे चुकले! 

 मग कसे काय बाई या कोरोनाने मला गाठले?


 सकाळी उठूनी आयुर्वेदिक काढा मी घशात ओतायची.

योगासनं पण नित्यनेमाने करायची

सगळ्या नियमांचे पालन मी केले. 

आहो! तरी पण कोरोनाने मला कसे काय गाठले? 


 आता थोडे, थोडे माझ्या लक्षात यायला लागले.

एके दिवशी थोडासा ताप आला आणि घसाही माझा घवघवला.

काहीतरी आंबटचिंबट खाण्यात आले असेल म्हणून, मी मनावर नाही घेतले.

असेल हवेतील बदलाचा परिणाम म्हणून थोडे दुर्लक्षच केले.. 

 पण दोन दिवसांनी या व्हायरल् नामक साथीने मला चांगलेच घेरले.

मग थोडी शंका आली. मग कोरोनाची टेस्ट केली.

पॉझिटिव्ह आली. खरंच या कोव्हिडने पॉझिटिव्ह या शब्दाची व्याख्याच बदलली.

मग मी हदरले, चांगलीच घाबरले. कसेतरी स्वत:हाला सावरले.

मग घरातच स्वतःचे विलगीकरण केले. सगळे नियम जातीने पाळले. 

 पण कसे काय कोरोनाने मला गाठले.


 या काळात घरातल्या सगळ्या सदस्याचे महत्व ऐकमेकांना कळले.

सगळया नातलगांचे काळजीचे फोन आले.

जमेल तशी मदतीचे हात पुढे झाले. 

 आज या कोरोनावर मात करून मी उभी राहिले.

मी नियम पाळले म्हणून घरातील इतर सदस्य बचावले. 

 गोष्ट छोटीच होती पण खूप काही शिकवून गेली.

आपण कितीही काळजी घेतली. पण छोटीशी गोष्ट चांगलीच महागात पडली. 

कोरोनाने हीच गोष्ट बरोब्बर हेरली. कोरोनाने बरोबर सावज शोधले.

मात्र बळीचा बकरा झाले. आणि या कोरोनाने मलाच गाठले. 


 आज खरंच अजुनही मला समजत नाही मी किती जिवाला जपले.

पण कोरोनाने कसे काय मला गाठले?..

तुमच्या तरी लक्षात येते का हो कोठे मी चुकले

कोणत्या नियमांचे मी उल्लंघन केले

म्हणून या कोरोनाने मला गाठले?

  

(तळटीप :-- वाचकहो! या कोरोनाचा माझ्याशी संबंध आला नाही सहज सुचले म्हणून लिहिले याची नोंद घ्यावी. व विनोदी बुध्दीने अस्वाद घ्यावा.

कोरोनाची ईडा, पिडा टळू दे, सगळे जग आनंदाने फुलू दे, हिच प्रार्थना करूया एकमेकाच्या साथीने सगळे नियम पाळूया, रोगाच्या साथीला तोडू या!)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy