कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.
उन्हाळ्यातही विजांसोबत पाऊस बरसतो,
अमावश्येलाही तो चंद्र आकाशात खीलतो,
म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.
रात्रभर आम्ही त्या सूर्याकडेच पाहतो,
धावण्याच्या स्पर्धेत आम्ही प्रकाशाला हरवतो,
म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.
न्युटन महाशयांनी वेगेचे तीन नियम लिहीले,
आमच्या मित्राने तीनीही नियम एकदाच मोडले,
म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.
दरवेळी प्रमाने किम जोन बहुमतांनी निवडुन आले,
त्यामुळे अर्बंट आयंस्टायनचे रोजगार हरवले,
म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.
n> अमेरिका व रशिया मधले शीतयुध्द संपले, चीनने पाकिस्तानवरती आक्रमण केले, म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं, कारण हे जगच आहे आगळं-वेगळं. आम्ही दुर्बिनीतुन नासाच्या प्रयोगशाळेत पाहिले, नासाने नविन घोडागाडी तयार केले, म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं, कारण हे जगच आहे आगळं-वेगळं. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रंप निवडुन आले, त्यांनी किम जोन ला सन्मानपुर्वक बोलावले, म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं, कारण हे जगच आहे आगळं-वेगळं. पुस्तकांनी संपूर्ण जगावरती राज्य केले, गुगलने आत्महत्येचा मार्ग स्वीकारले, म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं, कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.