आई मला जोराची भूक लागली
आई मला जोराची भूक लागली
माझ्या पोटामध्ये कावळे ओरडत बसले,
पोटातील लाजून उंदीरही पळुन गेले,
रात्रीची झोप माझी गं उडाली,
आई मला जोराची भूक लागली.
रस्त्यावरती चालताना चिवड्याचा सुगंध आला,
माझे मन तर त्याच दिशेने केव्हाच निघाला,
आता तर माझी प्रतिक्षाच संपली,
आई मला जोराची भूक ती लागली.
भर दुपारी लाडूवाला घरी आला,
काजू-बदामात लाडू त्याने तयार केला,
माझ्या जिभेवरती पाण्याची विहीर सापडली,
आई मला जोराची ती भूक लागली.
काल संध्याकाळी वांग्याची भाजी केली,
शेंगाच्या चटणीसोबत दही सुध्दा आटली,
तरी सुध्दा पोटामध्ये जागा शिल्लक राहिली,
आई मला जोराची भूक लागली.
त्या दगडाच्या जात्यावरती ज्वारी दळले,
त्यासोबत बहिणाबाईंच्या ओव्या म्हटले,
चुलीवरती चविष्ट भाकर आईने बनवली,
त्यामुळे आई, मला जोराची भूक लागली.
चविष्ट, मसालेदार व्यंजन आईने बनवले,
त्याच व्यंजनांचा वास नाकात दरमरळे,
तुझ्या हातच्या जेवणात प्रेम, आपुलकी उतरली,
म्हणूनच आई मला जोराची भूक लागली.
आई गं आई मला जोराची भूक ती लागली,
आई... मला भूक लागली,
तुझ्या पंचपक्वानाची चवदेखील चाखली,
गवारीची भाजी बोट चाखुन संपवली,
माफ कर आई,
आई मला आता झोप लागली.
