STORYMIRROR

Gaurav Daware

Comedy Drama

3  

Gaurav Daware

Comedy Drama

खारी घोटाळा करी....

खारी घोटाळा करी....

2 mins
240

आज म्या पहिल्यांदा लायब्ररीत गेलो 

भीत लाजत खुर्चीवर बसलो 

खुर्ची सरकवली त आवाज झाला 

पाये सगळे मायाकड जसा भुतच आला....... 


तिथे होती अफाट शांतता 

वाटे जसा पसरला सन्नाटा 

मी होतो एकटा अन बाकी सगळ्या पोरी 

वाटे मी पोहचलो इंद्राच्या दरबारी.........


तिथली प्रत्येक पोरगी मायाकडे पाये 

जसा मी राजा अन ते प्रजा हाये 

म्या माया दप्तराची चैन उघडली 

त प्रत्येक पोरगी शु शु म्हणत सुटली........ 


मग म्या थोडा जास्तच घाबरलो 

वाटे स्वर्ग समजून नरकात आलो 

मग पोटान गुडगुड आवाज केला 

म्या म्हटलं भूक लागलीय पोटाला........ 


पोटाले भूक लागली होती भारी 

पण दप्तरात होत्या दोन भिस्कीट अन खारी

थोडा आवाज करत खाल्या खारी सारी 

पोट्ट्या मायाकड पाय जसे दिमाखात मले मारी..... 


मन झालं तृप्त खाऊन सगळ्या खारी 

वाटे आता झोपावं इथंच क्षणभरी 

घेतली थोडी जोप अन झालो ढाराढूरी 

थोडा वेळ झालाच अन मी मात्र घोरी....... 


तिकडून आली एक पोट्टी म्हणे घोरू नको लयी 

मले येते झोप तुया घोरन्या पायी 

म्या म्हटलं म्या करतो आता अभ्यास 

होतो हुशार अन घेतो सन्यास....... 

 

पण थोडया वेळाने पोट गडबड करी 

खारी बहुतेक मले पडलाय भारी 

म्या कसाबसा कंट्रोल करी 

पण मागून माया आवाज झाला सर्वरी...... 


आता मात्र झाली फजीती सारी 

आवाज होता जसा बॉम्बस्फोट भारी 

सगळ्या पोट्ट्यानि लावले रुमाल नाकावरी 

मले वाटली लाज अन मी पळालो तूरतुरी....... 


धावत बेकरीवाल्याकड म्या गेलो भराभरी 

म्हटलं तुयी खारी खाऊन गेली इज्जत सारी 

पण म्या तुले माफ करिन ऐका अटीवरी 

माफी मग मायी अन पड माया पायावरी...... 


बेकरीवाला माय थोबाड पाहून जास्तच घाबरला 

त्याले माया अंदर दिसला ऐका खुनीचा चेहरा 

तो माया पायाला पडाले झुकला थोडा खाली 

तिकडून आली बेकरीवाल्याची पोट्टी लय भारी...... 


ती होती जशी पहिल्या पावसाचे सर 

पण माय पोट नव्हतं आताही बर 

तिच्या समोरच झाला मागून आवाज ढर ढर 

मले आली लाज अन म्या धावलो तरतर..... 


मायी यार सगळी किस्मत खराब 

पोट्टी समोर जाते इज्जत अपार

आता म्या घेतला एक निर्णय डोक्यावरी 

तेव्हापासून म्या सोडल्या खान खारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy