STORYMIRROR

Shivam Madrewar

Comedy

3  

Shivam Madrewar

Comedy

अरे गणेश असे किती दिवस चालायचे

अरे गणेश असे किती दिवस चालायचे

2 mins
302

एकमेकांकडे ते विदुषकासारखे पाहायचे,

काहीतरी विनोद करून जोरजोरात हसायचे,

त्याचीच आठवण काढून नंतर बोलत बसायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे 


वर्गामध्ये सर्वात पुढे आपणच बसायचे,

हळूच खडू तू चोरायचे व नाव माझ्यावर ढकलायचे,

दररोजच खडू आणायलाही मलाच पाठवायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे


हळूच मी डोकावून तिच्याकडे पाहायचे,

कानातल्या कानात तू मला चिडवायचे,

दररोज तिचेच नाव घेऊन मला रडवायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे


शाळेतून चालत चालत घराकडे निघायचे,

अचानक तिचे दर्शन आम्हाला घडायचे,

एका क्षणाचा विलंबही न करता ‘ वहिनी, वहिनी’ तू ओरडायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे


मी तिच्यावरती एखादी चारोळी लिहायचे,

गालातल्या गालातच मी तेव्हा हसायचे,

रात्रभर तीच चारोळी तू माझ्या कानात ओरडायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे


रविवार आला की जेवणाचा बेत करायचे,

शेवटी पनीर मसाल्यावर पोट भरवायचे,

नंतर रात्रभर गावोगाव फिरत हिंडायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे


एखाद्या रात्री संपूर्ण पुस्तक वाचून काढायचे,

एकेकांना नवनवीन माहिती सांगायचे,

त्याच माहिती वरती नंतर भांडणे करायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे


मेसवर जेवताना एकमेकांचे वाट्या लपवायचे,

जबरदस्ती चपात्या खाऊ घालायचे,

नंतर एकमेकांकडे क्रोधाने पाहायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे


एकमेकांपासून पाचशे किलोमीटर लांब जायचे,

आजही तुझ्यासोबत तासन-तास बोलायचे,

इतकेच नव्हे तर तुझे नाव काव्यसंग्रहाला द्यायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Comedy