STORYMIRROR

Sanjay Udgirkar

Comedy Romance

3  

Sanjay Udgirkar

Comedy Romance

कशी गं तू अशी

कशी गं तू अशी

2 mins
1.4K

कशी गं तू अशी.

मला हवी होती, तू आहेस तशी.

सद्गुणांची जणू खाण जशी.

एका प्रश्नाची दहा उत्तरे सदैव तयार तुझ्यापाशी.

सुंदर जणू नाकातील नथ जशी.

हातातल्या किणकिणत्या बांगड्या जशी.

कपाळावरच्या कुंकवा जशी.

गळ्यातील जशी ठुशी.

उमललेल्या पिवळ्या गुलाब जशी.

मावळत्या सूर्या जशी.

रातराणीच्या सुगंधा जशी.

खळखळत वाहणाऱ्या झर्‍या जशी.

तुझ्या सौंदर्याची तुलना करू तरी कोणाशी.

उपमाच सुचत नाहीये तुला देता येईल अशी.

तू दूधावरची लुसलुशीत साय जशी.

तुझी बरोबरी होऊ शकेल फक्त पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राशी.

माझ्या मनोराज्याची तू एकमेव पट्ट राणी असशी.

याची तुला जराही कल्पना नाही कशी.

तुझ्यासाठी मी आहे दूधात पडलेली माशी.

मला पाहताच का लावतेस रुमाल नाकाशी.

तुझे लग्न जमणार आहे फक्त माझ्याशी.

असे परवा म्हणत होती तुझी मावशी.

बाजारात गप्पा मारताना माझ्या आईशी.

तू मात्र नाकाने कांदे सोलशी.

जमत नाही म्हणे तुझे कोणाशी.

फटकळ आहेस म्हणे पेटलेल्या फुलबाजी जशी.

तुझे आरामात जमेल माझ्यासारख्या मधाळाशी.

अजिबात काळजी बाळगू नकोस उराशी.

काळजी वाहीन तुझी अहर्निशी.

छाटून टाकीन ओठांवरची छपरी मिशी.

तुझ्यासाठी पांढरीशुभ्र ठेवीन माझी बत्तिशी.

वचन देतो, तू कधीही होणार नाहीस मला नकोशी.

तू ओलांडली नाहीस अजून वीशी.

माझी चालू आहे गद्धे पंचवीशी.

माझे नाव आहे निशी.

मला माहीत आहे तुझे नाव आहे शशी.

घेतो अधूनमधून कधी कधी थोडीशी.

तसा माझा अजिबात संबंध नाही कोणत्याही व्यसनाशी.

अजिबात मैत्री नाही माझी, तंबाखूशी, सिगारेटशी, आणि विडीकाडीशी.

शपथेवर हे सर्व मी तुला सांगू शकतो गं शशी.

काहीतरी गोड गोड प्रेमाचे बोल ना माझ्याशी.

अहोरात्र प्रेम करू एकमेकांशी.

माझ्या हाताची करेन तुझ्यासाठी मऊ मऊ उशी.

आपल्या संसारात तू कप हो आणि मी होईन बशी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy