STORYMIRROR

Umakant Kale

Comedy

3  

Umakant Kale

Comedy

पिपळाचं पान

पिपळाचं पान

1 min
13.3K


पिंपळाचं पान ग बाई,पिंपळाचं पान,

गळून पडले माझे पिंपळाचं पान ।।धृ।।

नरवासनेची आता जडली काथ

डोळ्याची त्यांना असे साथ

अबला नारी! कास नको हरु?

हे बघ जग पायीधरु

पिंपळाचं पान ग बाई,पिंपळाचं पान,

गळून पडले माझे पिंपळाचं पान ।।१।।

समाजात राहुन चाले अत्याचार

जो-तो घालून आज सदाचार

नाही हो आई-बहीण त्याच्या घरी

लेकीबाळी येथे जाते लुटल्या जरी

पिंपळाचं पान ग बाई,पिंपळाचं पान,

गळून पडले माझे पिंपळाचं पान ।।२।।

आण तान खोटा घातला नकाब

चेहरा विदूषक, मन तयाचे गायब

ढगाळलेल्या परी लोकांच आक्रोश

कमी पडतो देवा येथे जोश

पिंपळाचं पान ग बाई,पिंपळाचं पान,

गळून पडले माझे पिंपळाचं पान ।।३।।

घरा-घरात चाले नारी अग्निपरीक्षा

सीतेने निवडावी आजची हो दिशा

नको होऊ तू पुन्हा सीता

नारी तूच लिव आता तुझी गाथा

पिंपळाचं पान ग बाई,पिंपळाचं पान,

गळून पडले माझे पिंपळाचं पान ।।४।।

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy