अर्धांगिनी
अर्धांगिनी
लक्ष्मी म्हणून आली घरी अर्धांगिनी,
नांदत होती घरात होवून गृहिणी.
बघतांना जणू वाटे मृगनयनी,
कळलेच नाही केव्हा केली मोहिनी.
नादात रमलो तीच्या त्या काळी,
संसाराचा ताण झेपण्याची आली पाळी.
तीच्या इच्छापूर्तीने आणली पाळी,
धन प्राप्तीसाठी धावलो वेळो-वेळी.
शरीर व मन थकले पैशा पाळी,
जाणवते सर्व लग्न वाढदिवसाच्या वेळी.
माझ्या कर्तृवचे श्रेय घेते ती व साळी,
मारते टोमणे घरी-दारी प्रत्येक वेळी.
माझ्यामुळे तुम्हचे नाही झाले वाटोळे,
माझ्या कृपेने तुमचे थाट दिसते जगा वेगळे.
सुन-जावयाची झाली लाडकी आई मनमोकळी,
तिचे थाट बघण्याची आली माझ्या वर पाळी.
आपल्याच थाटात व तो-यात दिसते ती वेळो-वेळी,
तिची वाट बघण्याचा छंद आता थकल्या काळी.
तिच्या प्रेमाची कोन भरणार ही पोकळी,
आपली चूक समजून ती भेटणार का उद्या सकाळी?.
थाटात करु पंचीविसवी लग्नवर्षगाठ पुढच्या वेळी,
आताच सांगते धाव-पळ नको मला ऐनवेळी.
म्हणूनच असतो लग्नलाडूचा स्वाद जगावेगळा,
स्वाद घेवू किंवा नाही अशी येवूच नये पाळी.
