व्यावहारिक गांधीवाद.
व्यावहारिक गांधीवाद.
व्यावहारिक गांधीवाद
विज्ञान आणी तंत्रज्ञानामुळे जग नक्कीच छोटे झाले,
पण विकसित व विकसनशील देशांचे धोरण बदलले.
मानवतेच्या संरक्षणापेक्षा आर्थिक समृध्दीचे महत्व वाढले,
प्रगतदेश मानवीविकासापेक्षा मानवीउपेक्षेसाठी तयार झाले.
विज्ञान व तंत्रज्ञान विध्वंसक शस्त्रसाठी वापरण्यात आले,
अनेक देशांनी पृथ्वीला नष्ट करणारे शस्त्र-अस्त्र तयार केले.
विध्वंसक शस्त्रचासाठा अनेक पटीने पृथ्वीवर वाढतच गेला,
त्यासाठी मूल्यवान अपार नैसर्गिकसाधनांचा गैरवापर केला गेला.
आर्थिक समृध्दीसाठी त्याचा व्यापार करणे सुरू झाले,
शस्त्र विक्रीसाठी विवादीत केंद्र शोधून काढण्यात आले,
नवेविवादीत केंद्र तयार करण्याचे प्रयत्नपण सुरूच झाले,
त्यासाठी राजनैतिक दबावतंत्राचा वेगाने प्रयत्न सुरू झाले.
विध्वंसक शस्त्रविक्रीसाठी नवीन-नवीन देशामध्ये वाद सुरु केले,
मानव विकासापेक्षा मानवाच्या अधोगतीचे शस्त्र बनवण्यात आले.
छोट्या-मोठ्या विवादासाठी विध्वंसक शस्त्रचा गैरवापर होत आहे,
हे मानवी कल्याणाचे मापदंड नेमके भविष्यात चुकीचे ठरणार आहे.
गांधीवाद हेच शस्त्र समस्यांचे निवारणशस्त्र हमकास आहे,
जगासमोर यशस्वी गांधीवादाचे जीवंत अनेक उदाहरण आहे.
शांती ,सहिष्णुता व अहिंसामुळे भारत स्वतंत्र झालाच आहे,
दक्षिण आफ्रिकेतील रंगभेद कायमचा मिटवण्यात आला आहे,
काळ्या लोकांना अमेरिकेत मतदानाचा समानहक्क भेटला आहे.
जगातील वाद-विवादित देशांनी जर गांधीवाद मार्गाने,
जर वाद सोडविले तरच त्यांची आर्थिक बचत होईल.
आणी त्यांच संसाधनाचा वापर देशवासीयांसाठी होईल,
गांधीवादामुळेच शस्त्र बाजारपेठा कायम बंद पडतील.
