जेन. सी.
जेन. सी.
जेन. सी.
निसर्गाने मानवासाठी केले सुंदर ग्रहाचे निर्माण.
सर्व मानवांची मूलभूत शरीररचना असते एकसमान.
काही स्वार्थी मानवाने बनवला कुठे भारत व जपान.
इतर ठिकाणी ईरान,अफगाण,रूस,इराक आणी यूक्रेन.
काही मानवांणी स्वार्थासाठी बनवला धर्माधिष्ठित जीवन,
धर्माची सतत शिटी वाजवतात पादरी,पुरोहित व मौलाना.
विविध धर्म जसे इस्लाम,ईसाई,सिख,बौद्ध,यहूदी व जैन,
हे सर्व धर्म वाटतात मानवता व मानव विनाशाचे कारण.
महाशक्तिशाली देश करतात सुरक्षेसाठी शस्त्राचे उतपादान,
त्यामुळे विश्वात वाढले विध्वंसक,विनाशकारी शस्त्राचे प्रमाण.
त्यासाठी खर्च होतात पृथ्वीवरचे अकारण नैसर्गिक संसाधन,
ते स्वतःच्या अर्थ समृध्दीसाठी करतात शस्त्रांची देवाण-घेवाण.
शस्त्र विक्रीसाठी महाशक्ति करतात गुप्त उपाय योजना,
त्यासाठी जगभरात बनवत्तात अनेक वाद व युध्दमैदान.
पृथ्वीवरील लहान-मोठ्या देशात लावतात अकारण भांडण,
शस्त्रविक्रीमुळे महाशक्तिदेशाला मिळते मोठे परकीय चलन.
या षडयंत्रात अटकलेले देशांचे होते मोठे नुकसान,
त्यासाठी खर्च होते मानव उपयोगी नैसर्गिक संसाधन.
या अकारण उपयोगामुळे नष्ट होतात पृथ्वीचे संसाधन,
अनेक देशात वाढत आहे बेरोजगारी, गरीबी विनाकारण.
या बेरोजगारी,धार्मिक आंतकवाद,भ्रष्टाचार व कुशासण,
श्रीलंका,बंगलादेश,नेपाल गरीब देशांचे त्रस्त झाले तरुण.
याच सर्व कारणांमुळे विश्व तरुणवर्ग बनला दिशाहीन,
भ्रष्ट शासनव्यवस्था मोडण्याची जेन.सी करते मनमानी.
तरणांच्या निशाण्यांवर असते स्वार्थीशासन व भ्रष्ट नेतागण,
ज्यामुळे विश्वात तिसरे महायुध्द होण्याची दिसते दाट संभावना.
जर तरुण पिढीच्या समस्यांचे नाही झाले योग्य निरसन,
तर मग विश्व जेन.सी जगातील नष्ट करेल कुशासन.
आणी मग जागतिक अर्थव्यवस्था होईलच दिशाहीन,
मग जेन.सी जाभारात कायम करेल सुख-शांतीचे शासन.
बेरोजगारी व अकारण नैसर्गिक संसाधचे दोहन,
वर्तमान तरुण व येणाऱ्या पीढ़ीचे निघतील प्राण.
अनेक देशाजवळ खंडीय व आंतरखंडीय क्षेपणास्त्र,
अग्निबाणांसाठी लागणारी असंख्य लढाऊ विमान.
याच कारणांमुळे जर कदाचित विश्वयुध्द भडकले,
तर पृथ्वीवरील मानव व जीव-जंतु होतील निष्प्राण.
नंतर मग आइन्सटाइनची साकार होईल भविष्यवाणी,
चौथे विश्वयुध्दमध्ये वापरतील पुन्हा गोटे व धनुष्य बाण.
