मानवी जीवनप्रवाह.
मानवी जीवनप्रवाह.
मानवी जीवनप्रवाह
सुखीमन हेच असते श्रीमंतीचे खरे माहेरघर,
उज्जवळ जीवनशैलीचे जणू तेच खरे प्रवेशदार.
छोट्या-छोट्याच बाबी टाकटात आयुष्यात भर,
मित्रमंडळी,नातेवाईकच आहे आनंदाचे खरे माहेर.
बाळपणात आई-वडिलांची असते प्रेमाची छाया,
किशोरवयात मित्रांची अफाट असते दाट माया.
सफल जीवनासाठी करिअर बनविण्याचे खरे भय,
तरुणपनातच असते मित्र-मैत्रीणींची भरभरून दया.
करिअर आणते सांसारिक जीवनात आनंद वेगाने,
परिवाराकडे झुकते माप नदी प्रवाहाच्या दिशेने.
सहचारणीची साथ असते जीवनप्रवाहाच्या मार्गाने,
वाढता वंश देते मनाला सुख-शांती व आनंद तीव्रतेने.
वाटते या भोबड्या मनाला पहावी रोज नवी सकाळ,
पण इच्छा तीथेच मांदावते बघून समोर वृध्दापकाळ.
कधीतरी संपणारच आहे मिळालेला नश्वर जीवनकाळ,
मग मी कां होवू नये चिंतामुक्त बघून नवीन सकाळ?
