साडी मम प्रिय सखी
साडी मम प्रिय सखी
छंद मला आहे साडी पाहण्याचा
अन् आवडली की घेण्याचा
सुंदर सुंदर रंग तयांचे
नक्षीकाम किती सुरेख
नाना तऱ्हेचे सुत तयांचे
प्रकार त्यांचे अनेक
बनारसी, पैठणी, बांधणी, गढवाल कॉटन,
कांजीवरम, लिनेन, खादी
असे नानाविध प्रकार तयांचे
मन पाहण्यात गुंतते माझे
साडी साडी जिकडे तिकडे साडी दिसे
सर्व स्त्रियांची आवडती ही साडी असे
ऑनलाईन पण साडी बघते
ऑफलाईन जावून घेते
मला फार आवडे साडी
सर्वांची ती खास सवांगडी
मनात माझ्या साडी बसे
स्वप्नातही मज साडी दिसे
असा लागला मज साडी नाद
घरात होतात त्यामुळे वाद
आठवणीतील क्षण असे साडी पाहणे
कितीही महाग असेल तरीही ती घेणे
