Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Comedy

3.8  

Neha Ranalkar

Comedy

कोरोनाच्या काळातील मुलगी कोरोना

कोरोनाच्या काळातील मुलगी कोरोना

1 min
260


कोरोनाच्याा काळात मुलगी झाली

नाव सुचवंलच कुणीतरी कोरोना |

ऐकून इतरांनी मुरडली नाकं पण

मलाच आली तिची करुणा | |१| | 


आधीच अजूनही ब-याच घरात

मुलगी नसलेलीच वाटतेय बरी | 

कोरोना महामारीच दिले नाव तर

कुठल्या रुपात ती वाटेल परी? | |२| |


पूर्वापार मुलगाच वाटत होता खरा

वंशाचा दिवा चितेस देणारा आग |

कोरोना नावे मुलीच्या पत्रिकेतही

शनीग्रहाचाच तिच्यावर अनुराग | |३| |


कोविड शील्ड लस घेतलेलाच का

फक्त तिला लग्नासाठी चालेल? |

लग्न झालंच तर उठल्या बसल्या

तिचंच नाव घेऊन शिव्या घालेल? | |४| |


सासरी गेल्यावर होईल का स्वागत

आत ये गं कोरोना असं म्हणत? |

ती घरात प्रवेश करण्याच्या आधी

घरातलेच बाहेर जातील तणतणत |५| |


मुलगी शिकली प्रगती झाली म्हणे

पहिली बेटी कोरोनाची का देण ? | 

नवरा मुलाला उखाणा घेतांनाच

इतरांसमोर येईल छातीतच पेन | | |६| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy