STORYMIRROR

Jyoti gosavi

Comedy

3  

Jyoti gosavi

Comedy

किटकिट करते घरात

किटकिट करते घरात

1 min
296

कधी जुने कधी नवे

  काढते भांडण जोरात

तिला काहीतरी कारण हवे

     मागते काही रोज नवे

हीचा मेकअप, हीचे कपडे

भागेना माझ्या पगारात

किटकिट करते घरात

पडता पाऊल दारात


कधी रागाने जाते माहेरी

कधी घरातच करते शिरजोरी

विनंती अर्ज करूनि सारी

कधीचा ऊभा मी दारात

किटकिट करते घरात

पडता पाऊल दारात


साडी आणता जाते हुरळून

केसात गजरा दावी माळून

याच अदावर मी जातो भाळून

तरी बिचारा मी बाहेर उभा

दुरूनच असतो न्याहाळत

किटकिट करते घरात

पडता पाऊल दारात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy