पावसाची मज्जा
पावसाची मज्जा
सरस्वती
विद्या देती
आम्ही मुले
ज्ञान घेती..१
पावसाची
मजा न्यारी
एक छत्री
तीन भारी..२
शाळा माझी
देते मान
उपक्रम
घेते छान..३
आई माझी
कष्ट करी
घाम गाळे
बाप खरी..४
मुले आम्ही
खोडकर
गुरु म्हणे
कान धर..५
वाट पाहे
माय बाप
डोक्याला तो
मोठा ताप...६
शिक्षणाची
आवड ती
शिक्षा देई
बाई हो ही..७
पाऊस तो
रिम झिम
पोरं झाले
ओले चिंब..
