बाप
बाप
1 min
373
शेतकरी बाप
राबतो उन्हात
कस येई साल
विचार मनात...(१)
पोसतो घराला
नसे काही कमी
सर्व काही मागा
हीच देतो हमी...(२)
आपल्या पोरांचे
लाड कोड करी
सांभाळतो तोल
त्यांचे हात धरी...(३)
मनात कुडतो
ओठात हसतो
संसाराचा राडा
धरुनि जगतो...(४)
जीव लावी खूप
खांद्यावरी धरी
आनंदाचे अश्रु
बरसते सरी...(५)
माया ममता ती
असे त्याच्या मनी
आई कशी म्हणे
सुखी ठेव धनी...(६)
