आयुष्य
आयुष्य
1 min
330
छान आयुष्य आपलं
द्यावा नवीन आकार
नवी आशा नवी दिशा
स्वप्न होईल साकार...(१)
जून सोडून द्यावे ते
नवे आत्मसात करू
येवो कितीपण दुःख
एक मेका हात धरू...(२)
आयुष्याच्या वाटेवर
सुख दुःखाचा तो खेळ
नवी आशा घेवुनी ती
बसे जीवनाचा मेळ...(३)
झेप घेऊया आकाशी
भासे गगन भरारी
उंच आयुष्याची दोरी
मिळे जगण्या उभारी...(४)
