STORYMIRROR

Nutan Pattil

Comedy

3  

Nutan Pattil

Comedy

होईन मी राणी

होईन मी राणी

1 min
214

खरच कंटाळले

मी या जीवनात

चपाती लाटून लाटून

आयुष्य गेले स्वयंपाकात


आई हवा लाडू

तर नवऱ्याची फरमाईश दुसरी

सासू मागते कॉफी

तर एवढ्यात पाहुणे आले घरी


केवढा हा पसारा

जिंदगीने मांडला

नाकीनऊ आले आता

बोका आत्ताच माझ्याशी भांडला!!


रोज म्हणते 

फिरायला जाऊ

कुल्फी चॉकलेट 

घरी आणू

पण काय करायचे

तेवढ्यात टपकतात घरी

शेजारचे नानू!!


शेवटी बसते चूप

समाधानी रहाते

होईल कधीतरी मी पण क्वीन

असे मनाला रोज समजावते!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy